सामाजिक कार्य
श्री जे.के जाधव हे विविधांगी व्यक्तिमत्व आहे. कोणत्याही प्रकारची श्रीमंत कौटूबिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी जिद्दा, आणि कष्ट यांच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केले. आणि त्या विश्वात समाजातील सर्व घटकांना सामावून व सांभाळून घेतले. सरळ सोट उंच वाढत जाणार्या निलगिरीच्या झाडापेक्षा अवतीभोवती विस्तारत जाणार्या व पारंब्या फुटणार्या वटवृक्षाचे जीवन त्यांनी पसंत केले, आणि त्यामुळेच आपल्या सावलीचा लाभ ते इतरांना देऊ शकले. मनाची उपजत संवेदनशीलता, समाज मनाची उत्तम पारख, कोणत्याही समस्येच्या तळात घुसून तिची विवेकनिष्ठा उकल करण्याचे कासब, व्यवहार व तत्व यांची सांगड घालण्याची हातोटी आणि सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी इत्यादि गुणामुळे अडीच एकर शेती पासून ते उद्योग संचालक पदापर्यंतचा प्रवास त्यांनी केला. जे.के. जाधव यांना समाज सुधारणे साठी झालेली सामाजिक जाणीव ही महात्मा फुले, राजर्षि शाहू , महात्मा गांधी, आल्बर्ट आइनस्टाईन, स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून मुळली होती असेच त्यांनी केलेले समाज कार्य प्रवासा विषयी आपण जाणून घेऊया.
लोकविकास बँक : श्री जे. के. जाधव यांनी त्यांच्या मित्राच्या सहकार्याने लोकविकास नागरी सहकारी बँकेची औरंगाबाद येथे 1998 मध्ये स्थापना केली सध्या या बँकेच्या नऊ शाखा औरंगाबाद परिसरात असून सुमारे सत्तर हजार गरजू व्यक्तींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज दिले आहे. तसेच बँकेच्या शाखेत सुमारे शंभर कर्मचारी / अधिकार्यांना नोकरी मिळाली आहे.
इतर सामाजिक उपक्रम आणि संस्थापक
1. श्री शंकर स्वामी औद्योगिक वसाहत, शिउर ता. वैजापुर, जि. औरंगाबाद.
2. किसान विकास जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था / लि. कंपनी.
3. श्री शंकर स्वामी वारकरी विद्यालय, शिउर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद.
4. साईबाबा रूरल हॉस्पिटल अँड ट्रौमा सेंटर, शिउर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद.
5. मराठवाडा लोकविकास मंच, मुंबई. (संस्थापक अध्यक्ष)
6. स्वामी रामानंद तीर्थ स्मारक प्रतिष्ठान, मुंबई.(संस्थापक महासचिव)
7. मराठवाडा टेक्नोलोजीस्ट्स असोसिएशन, मुंबई. (संस्थापक अध्यक्ष)
एम. आय. डी सी. वैजापूर जि. औरंगाबाद / टेक्सटाईलपार्क
एम.आय.डी.सी. वैजापूर येथील सुमारे 1200 एकर क्षेत्रात विविध उद्योग स्थापन करण्यासाठी श्री जे. के. जाधव प्रयत्नशील आहे. या ठिकाणी सुमारे 300 एकर मध्ये टेक्सटाईल पार्क स्थापन करून या पार्क मध्ये स्पीनिंग, बिल्डिंग, प्रोसेसिंग, रेडिमेड गार्मेंट्स, टेक्निकल टेक्सटाईल इत्यादि टेक्सटाईल उद्योग सुरू करण्यासाठी जे. के. जाधव यांचे प्रयत्न चालू आहेत. 15 जून 2007 रोजी तत्कालीन उद्योग मंत्री श्री अशोक चव्हाण (माजी मुख्यमंत्री) यांच्या हस्ते वैजापूर येथे उद्योजकांना भूखंड वाटप करण्याचा समारंभ संपन्न झाला.
विनायक सहकारी साखर कारखाना, वैजापूर सुरू करण्यासाठी प्रयत्न शील.