राजकीय कार्य

 

मातीच्या समृद्धी साठी, डौलदार पिकासाठी पाण्याप्रमाणेच मशागतीची सुद्धा गरज असते, घामाचीहि आवश्यकता असते. नंतर घामाची फुले होतात. जे.के. जाधव यांचे शैक्षणिक, सामजिक, आर्थिक कार्यक्षेत्र विस्तृत होऊ लागले. शासकीय नोकरीत असताना त्यांनी वैजापूर शहराच्या विकासासाठी बळकटी मिळावी यासाठी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः च्या बळावर स्वावलंबी होता येईल या दृष्टीकोणातून अनेक उद्योग धंदे उभारले. वैजापूर विकासात त्यांचा सक्रिय सहभाग ते नोंदवू लागले. त्यामुळे जनसामान्यांच्या गळ्याच्या ताईत ते बांधले गेले. त्याच दरम्यान 2004 मध्ये राज्यात विधान सभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा जे. के. जाधव यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. परंतु समाजसेवेचे व्रत त्यांना मुळीच चैन बसू देत नव्हते. शासकीय सेवेत असताना देखील विविध कार्ये त्यांनी वैजापूरच्या जणते साठी केली होती. आता राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी समाज सेवा करण्याचे ठरविले. दिनांक 13 जुलै 2005 रोजी जे.के. जाधव यांनी कॉंग्रेस पक्षा मध्ये प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचे स्वागत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या हस्ते झाल. त्यानंतर काहीच दिवसात जे.के जाधव यांची प्रदेश कॉंग्रेसच्या उच्च व तंत्र शिक्षण सेल च्या अध्यक्षपदी निवड झाली.

 

भूषवलेली पदे 

1. राज्य मुख्य संयोजक, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी (उच्च व तंत्र शिक्षण सेल).

2. विभागीय उपाध्यक्ष नवोदय विद्यालय समिति, भारत सरकार, नवी दिल्ली.

3. अध्यक्ष, वैजापूर तालुका, रोजगार हमी समिति.

4. उपाध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटी.

5. सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, औरंगाबाद.(सामान्य शिक्षण तंत्र व व्यवसाय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण)

6. सदस्य, जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षण शाळेचे संनियंत्रण व शैक्षणिक गुणवत्ता वाढ समिति, औरंगाबाद.

 

जे.के जाधव यांचे काही राजकीय क्षण