जे. के. जाधव

आयुष्यात मी थोडे फार शैक्षणिक आणि समाज कार्य करू शकलो याचा माला आनंद होत आहे. हे कार्य मी वयाच्या 35 व्या वर्षी सुरू केले "इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेणु गेला गगनावरी" असे आमच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्वरूप झाले आहे. हे कार्य करताना सुरवातीपासून ते आजपर्यंत अनेक संकटे आली, स्वकीयांनी आणि इतरांनी आणे प्रकारचा त्रास दिला, अनेकांनी खूप सहकार्य केले.

आपल्या देशात विकासाच्या अनेक संधि आहेत. देशातील 50 टक्के लोक अजूनही दारिद्रयत आणि अज्ञानात जीवन जगत आहे, या देशात राहणार्‍या सर्वांचा विकास करून त्यांना दारीदर्‍याच्या आणि अज्ञानाचा अंधारातून बाहेर काढणे शक्य आहे. परंतु समाजातील काही स्वयंकेंद्रीय आणि काही लोकांच्या स्वार्थी वृत्ती मुळे हे शक्य होत नाही. विशेषतः राजकीय क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्ति, सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींची प्रसिद्धी समाजात होऊ नये म्हणून त्यांना विरोध करतात. अशा प्रकारची विधायक आणि विकासात्मक काम होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असतात.

1984 पासून ते आजपर्यंत मी माझ्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या प्रयत्नामुळे इथपर्यंत येऊ शकलो. माझे बंधु एकनाथराव जाधव यांच्या सहकार्याने अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्था सुरू केल्या. श्री. एकनाथराव जाधव, श्री आसाराम बोडखे, श्री. माणिकचंद चुडीवाल, श्री. अनंतलाल पहाडे. अॅड. डी. बी. शिउरकर, श्री. डॉ. के.एच. लोहाडे, श्री. देवदत्त देशमाने, श्री. अर्जुन गायके, श्री. अशोक जाधव, श्री नामदेवराव पवार, श्री. विजय खाचणे, प्रा. व्ही डी. गाडेकर, श्री. प्रल्हाद कसबेकर, श्री. रावसाहेब शेळके आदि. अनेक माण्यावरांच्या सहकार्याने मी हे शैक्षणिक व समाजकार्य करू शकलो. माझे सासरे अॅड. बाळकृष्ण देशमाने, माझे वडील कै. खंडेराव जाधव, अॅड. विजय देशमाने, माजी पत्नी सौ. सरस्वती जाधव आणि मुलगा विक्रांत जाधव, मुलगी डॉ. क्रांति खालकर, डॉ. किर्ति साखरे यांनी वेळोवेळी माझ्या कार्यात खूप मदत केली.

निसर्गात मनुष्य प्राणी हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. प्रत्येक माणूस जन्माला येत असताना त्याच्या आई-वडिलांची त्याच्याविषयी काही स्वप्ने असतात. तसेच ज्या परमेश्वराने त्याला जन्म दिला त्या परमेश्वराची सुद्धा त्या व्यक्ति कडून समाज कार्य करण्याविषयी काही स्वप्ने असतात. प्रत्येक व्यक्तीत स्वतः.चा आणि समाजाचा विकास करण्याची क्षमता असते. तसेच स्वतःच्या व समाजाचा विनाश करण्याचीही क्षमता असते. या दोन्ही पैकी आपली क्षमता कुठली वापरायची हे आपण प्रत्येकाने ठरविले पाहिजे.

मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर या लहानशा गावी एक गरीब व अशिक्षित कुटुंबात माझा जन्म झाला. परमेश्वराच्या अगाध कृपेने माझे शिक्षण झाले व माझ्यात धडपड करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. या धडपडीमुळेच मी थोडे फार कार्य करू शकलो. कर्म करणे हीच ईश्वर पुजा आहे असे मी मानतो. समाजातील उच्च शिक्षित आणि समृद्ध व्यकींना दरिद्रयच्या आणि अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या आपल्या हाजारो बांधवांचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी माजी धारणा आहे. या जागतील मनुष्य प्राण्याचे दुःख संपलेले नाही. भगवान बुद्ध होऊन गेले, तरी या जगातील  दुःख नाहीसे झाले असे माला वाटत नाही. जोपर्यंत प्रत्येक मनुष्य प्राणी यूगानुयुगे इतर मनुष्य प्राण्याला मदत करणार नाही तोपर्यंत या जगातील दुःख  कमी होईल असे माला वाटत नाही. शेवटी सर्व प्राणिमात्रा सुखी होवोत अशी पुढील प्रार्थणा ईश्वरचरणी करतो.

सर्वत्रे सुखीन: संतु ,

सर्वे संतु निरामय !

सर्वे भद्राणी पश्यंतू,

मा कश्चित दुःख माप्नयात ||

जे.के. जाधव