आत्मचरित्र

"तरुणांनो, स्वावलंबी आणि श्रीमंत व्हा !"

हा जे. के. जाधव (दादा) ह्यांच्या जीवनाचा एकमेव मंत्र आणि तरुणांसाठी संदेश आहे. त्यांच्या संपर्कात आलेली, त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेली प्रत्येक व्यक्ति आज 'स्वावलंबी आणि श्रीमंत' होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या तरुणांना 'स्वावलंबी आणि श्रीमंत' होण्यासाठी प्रेरणा देऊन त्याकरिता शक्य ते सहकार्य करणे, हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे. हीच त्यांची समाजासाठी असलेली समाजसेवा आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थे मार्फत ज्या काही तीस चाळीस शाळा महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे, त्याच्यासोबत विविध प्रकारचे सामाजिक आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक प्रकल्प अथवा उपक्रम आहेत त्या सर्वे उपक्रमा मध्ये आज जवळपास दोन हजार पेक्षा अधिक लोक कार्यरत आहे. ते सर्व लोक आज जे.के. दादांमुळेच सुखी समृद्ध आणि आनंददायक जीवन जगत आहे. अश्या महान व्यक्तिमत्वा विषयी आपण जाणून घेऊया.

औरंगाबाद जिल्ह्यातील मागासलेला तालुका म्हणून परिचित असलेला वैजापूर तालुका या तालुक्यातील शिउर येथे रावणाने तप केले. त्या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र जिवाची पर्वा न करता कार्य करणारे हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक खंडेराव जाधव आणि पार्वतीबाई जाधव या सत्प्रवृत दांपत्यापोटी 07 जुलै 1949 रोजी श्री.  जगन्नाथराव जाधव यांचा जन्म झाला. या दांपत्यास जगन्नाथ व एकनाथ अशी दोन मुले आणि शकुंतला, गया, विमल, सुमन, अशा चार मुली झाल्या. सर्वात मोठा जगन्नाथ व लहान एकनाथ  घरची परिस्थिति अत्यंत हलाखीची होती तरीही न डगमगता खंडेरावांनी मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले . अशा सच्छील परिवारात जन्म घेतलेल्या जे. के. जाधव यांचे बालपण शिउर येथे गेले.स्वातंत्र्य प्राप्त झाल्या नंतर भारतात शिक्षणाची दुरावस्था बनली होती. अशा काळात शिउर मध्येच जे. के. जाधव यांनी प्रार्थमिक शिक्षण घेण्यास सुरवात केली. सन 1966 मध्ये ते दहावीच्या परीक्षेस बसले व प्रशाळेत एस.एस. सी. मध्ये 71.50 टक्के गुण घेऊन शिउर तालुक्यात सर्व प्रथम आले. तेव्हा वैजापूर येथील न्यायालयातील प्रसिद्ध अॅड. श्री. प्रभाकर देशपांडे यांच्या कडून त्यांचा सत्कार व त्यांना पारितोषिक देण्यात आले. शालेय जीवनात जे.के जाधव यांना वाचनाचा, लिखाणाचा छंद तर होताच त्याच्या बरोबर निबंध, वक्तृत्व स्पर्धात ही त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ' शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा विचार त्यांनी आमलात आणला, त्यासाठी शिउर येथील दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद शहर गाठले. औरंगाबादला आल्या नंतर त्यांनी सन 1966 मध्ये 11 वीला देवगिरी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी म.प्र.का.क. चे अध्यक्ष विणायकराव पाटील हे होते. शिक्षण घेत असताना जे. के जाधव यांनी खूप हालाखीचे दिवस काढले. शिक्षणा बरोबरच वाचन, एन. सी.सी., वक्तृत्व, इत्यादि आवड असणारे जे. के जाधव यांनी इंग्रजी मध्ये  'The Memoirs' हा लेख लिहिला व तो लेख प्रकाशित झाला. सन 1966-1968 या काळात त्यांनी 59 टक्के गुण घेऊन अपली बारावी पूर्ण केली.

व्यक्तीच्या उपजत गुणांना वाव देण्याचे काम शिक्षणाचे आहे. व्यक्ति मध्ये जे चांगले गुण आहे ते सहज पने बाहेर पडले पाहिजेत त्या गुणांच्या विकासाला शिक्षणामुळेच वाव मिळाला पाहिजे. या हेतूने प्रेरित होऊन जे. के. जाधव यांनी सन 1968 मध्ये औरंगाबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. औरंगबादेत होणारे वेगवेगळे संस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, शिबिरे व चर्चा सत्रे यांना जे.के. जाधव जाणीव पूर्वक हजर राहत. जे.के. जाधव यांना लागलेली वाचनाची, व लिखाणाची आवड आणि कामाचा प्रचंड उत्साह या गुणांचे वर्णन शब्दांच्या पलीकडे आहे. त्यामुळेच महाविद्यालयीन स्टुडंट्स कौन्सिलमध्ये मेगझिण सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड झाली. सन 1972 मध्ये बी. ई. (विद्युत) विशेष प्रावीण्यसह( डिस्टिंकशन ) घेऊन मराठवाडा विद्यापीठातून ते सहाव्या क्रमांकाने उतीर्ण झाले.

जे. के. जाधव यांनी औरंगाबादेत शिक्षण घेत असताना पुष्कळ गोष्टी आत्मसात केल्या. अभियांत्रिकीचे शिक्षण अत्यंत गरीब परिस्थितीत उतीर्ण झाल्यावर पुढे काय? हा प्रश्न मनात घर करून होता त्यामुळे नोकरीच्या शोधात ते प्रत्येक ठिकाणी फिरू लागले त्याच दरम्यान डिसेंबर 1972 मध्ये जे.के. जाधव यांना एम. एस.ई. बी म्हणजेच महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा नोकरीचा कॉल आला औष्णिक विद्युत केंद्र नाशिक येथील नौकरीच्या संदर्भात तो होता व ते नोकरीस रुजू झाले. या जगात परिश्रम करणे सर्व श्रेष्ठ आहे  जे.के. जाधव यांनी जीवनात खूप परिश्रम केले. त्यावेळेस महाराष्ट्र पुब्लिक सर्विस कमिशन तर्फे आधिकार्‍याच्या जाहिराती साठी जाहिराती येत. आपण त्या परीक्षेत बसावं अस त्यांना खूप वाटायच. त्यातच त्यांना नांदेड येथे दुसरी नौकरी मिळाली काही प्रश्नांची उत्तर काळच देत असतो औरंगाबाद येथे त्यांना मराठवाडा डेवलोपमेंट कॉर्पोरेशन मधील  'टेक्स्कोम' या कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली. परंतु शिक्षणविषयक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती या दरम्यान त्यांनी नांदेड येथे विविध कार्य करून जनसामान्यांवर आपली पकड मजबूत केली त्यांनी कनिष्ठ अभियंता पदावर असताना मराठवड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, वडवणी, नांदेड, लातूर, परळी या ठिकाणी पॉवरलुम प्रोजेक्ट ची उभारणी व मेंटेनन्सची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली.

नांदेड ला असताना जे.के. जाधव यांनी वर्तमान पत्रातून येणार्‍या जाहिराती, कात्रणे , नोकरीविषयक, जाहिराती, यावर आपले लक्षं केन्द्रित केले त्याच दरम्यान वर्तमान पत्रामध्ये असिस्टंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे सहायक उद्योग संचालक वर्ग -1 या पदासाठी जागा निघाली होती ही आलेली संधी त्यांना सोडायची नव्हती. जे.के. जाधव यांच्या अंगी असणारी जिद्द आणि चिकाटी मुळे त्यांनी ती परीक्षा उतीर्ण करून मुंबई मध्ये एम पी एस सी चे त्यावेळेस चे अध्यक्ष शेषराव वानखेडे यांनी जे.के. जाधव यांची मुलाखत घेऊन त्यांना 25 फेब्रुवारी 1975 रोजी त्यांची नेमणूक असिस्टंट डायरेक्टर म्हणून नागपूर येथे करण्यात आली सर्वांना आनंद झाला खंडेराव जाधव यांचे थोरले सुपुत्र सहायक उद्योग संचालक वर्ग -1 या पदावर रुजू झाले संपूर्ण शिउर व पंचक्रोशीत आनंद झाला.

जे.के जाधव हे उद्योग खात्यात नोकरीला असताना त्यांनी अनेक मुलांना वेगवेगळ्या कारखान्यात , कंपनीत नोकरीला लावले होते. असंख्य तरुण तरुणी त्यांच्या कडे नोकरी संदर्भात, उद्योग व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी यायचे. या सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपण काही केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक शिक्षण मिळावे व त्यांनी लहान ग्रामोद्योग सुरू करून स्वतः स्वावलंबी बनावे या उद्देशाने त्यांनी एखादी संस्था महाराष्ट्रात उभारण्याचे ठरविले. यालाच अनुसरून 1984 मध्ये त्यांनी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थे मध्ये ते स्वतः व त्यांच्या विश्वासतील सहकारी अनंत पुराणिक, मणिकचंद चुडीवाल इत्यादींना संस्थेच्या संचालक मंडळावर घेतले. तसेच आपल्या सहकार्‍यांशी चर्चा करून भा. ग्रा. पू. संस्थेच्या पहिल्या अध्यक्ष्या म्हणून सौ. सरस्वती जाधव यांची निवड करण्यात आली.1984 साली स्थापन केलेल्या भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेने पूर्ण महाराष्ट्रात प्रार्थमीक शाळा, माध्यमिक शाळा, विविध महाविद्यालये तसेच इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक महाविद्यालये तसेच अनेक उच्च दर्जाच्या शैक्षणिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमाच्या संस्था जे.के. जाधव नॉलेज सेंटर च्या अंतर्गत यांनी स्थापन केल्या.

13 जुलै 2005 रोजी जे.के जाधव यांनी कॉंग्रेस पक्षा मध्ये प्रवेश घेतला, व त्यानंतर त्यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस च्या उच्चा व तंत्रशिक्षण सेल च्ये अध्यक्ष पदी निवड झाली. या दरम्यान त्यांनी बरेच समाज कार्य केले. जनतेकडून ठेवी स्वीकाणारी आणि गरजूंना कर्ज देणारी संस्था म्हणजे बँक होय.उत्पन्न मिळविण्याकरिता नोकरी किंवा व्यवसाय, धंदा हे कायदेशीर मार्ग आहे सध्या परिस्थिति मध्ये मुक्त धोरण व जागतिकीकरण प्रभावामुळे गरजांची यादी मारुतीच्या शेपटी प्रमाणे वाढतच आहे. उत्पन्न व खर्चांची तोंडमिळवणी करण्यासाठी नियमित - अनियमित उत्पन्न सोबत मित्रा नातेवाईकांकडून तात्पुरते सहाय्य घ्याके लागते. सध्या संबधित सुद्धा अडचणीत असल्याने बँक किंवा वित्तीय संस्थांचा दरवाजा ठोठावल्याशिवाय गत्यंतर नाही. उधारी किंवा कर्ज घेणे अयोग्य नसून त्याची परतफेड मात्र असुविधजणक वाटत असते. थकीत कर्जा बाबत बँक आणि कर्जदार दोघेही चिंताग्रस्त असतात. अश्यांच्या जीवनात प्रकाशाची नवीन ज्योत जे.के. जाधव यांनी पेटवली व सन 1996 मध्ये त्यांनी 'लोकविकास नागरी सहकारी बँक' ची स्थापना केली. आजच्या घडीला लोकविकास बँकेने 70000 गरजू व्यक्तींना कर्ज दिले आहे.