जे. के. जाधव
आयुष्यात मी थोडे फार शैक्षणिक आणि समाज कार्य करू शकलो याचा माला आनंद होत आहे. हे कार्य मी वयाच्या 35 व्या वर्षी सुरू केले "इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेणु गेला गगनावरी" असे आमच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्वरूप झाले आहे. हे कार्य करताना सुरवातीपासून ते आजपर्यंत अनेक संकटे आली, स्वकीयांनी आणि इतरांनी आणे प्रकारचा त्रास दिला, अनेकांनी खूप सहकार्य केले.
आपल्या देशात विकासाच्या अनेक संधि आहेत. देशातील 50 टक्के लोक अजूनही दारिद्रयत आणि अज्ञानात जीवन जगत आहे, या देशात राहणार्या सर्वांचा विकास करून त्यांना दारीदर्याच्या आणि अज्ञानाचा अंधारातून बाहेर काढणे शक्य आहे. परंतु समाजातील काही स्वयंकेंद्रीय आणि काही लोकांच्या स्वार्थी वृत्ती मुळे हे शक्य होत नाही. विशेषतः राजकीय क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्ति, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींची प्रसिद्धी समाजात होऊ नये म्हणून त्यांना विरोध करतात. अशा प्रकारची विधायक आणि विकासात्मक काम होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असतात.